23.9 C
Latur
Monday, September 9, 2024
Homeराष्ट्रीयभाकप नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन

भाकप नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन

कोलकाता : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचे गुरुवार, दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८.२० वाजता निधन झाले. कोलकातामधील पाम एव्हेन्यू येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ८० वर्षीय भट्टाचार्य गेल्या काही वर्षांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते. भट्टाचार्य यांच्या पश्चात त्यांची पत्नी मीरा आणि मुलगी सुचेतना असा परिवार आहे.

बुधवारी रात्री बुद्धदेव यांची प्रकृती खालावली. त्यामुळे डॉक्टरांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता त्यांची प्रकृती तपासून रुग्णालयात दाखल करावे की नाही, हा निर्णय घेण्याचे ठरविले होते. मात्र सकाळी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. पश्चिम बंगाल आणि एकूणच देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेले ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ज्योती बसू हे आरोग्याच्या कारणास्तव २००० साली मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR