19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeक्राइमटाका येथे दुपारी वाद आणि संध्याकाळी खून

टाका येथे दुपारी वाद आणि संध्याकाळी खून

एकमत ऑनलाईन

 

औसा तालुक्यातील घटना, मारेकरी अटकेत

औसा : तालुक्यातील टाका येथे किरकोळ कारणावरून शैलेश कांबळे या २६ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना घडलीआहे. यासंबंधी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ११ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी बाबाराव उर्फ शैलेश कांबळे व रवी कांबळे यांच्यात किरकोळ कारणावरून गावातच कुरबूर झाली होती. त्याचा राग मनात धरून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बाबाराव उर्फ शैलेश हा गावातील ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी असलेल्या कट्ट्यावर बसलेला होता. त्यावेळी त्याच्या अंगावर रवी कांबळे याने सत्तूरने सपासप वार केले आणि तेथून तो पळून गेला. दरम्यान, गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या बाबारावला गावातील लोकांनी खाजगी वाहनातून लातूरच्या शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा रात्री उशिरा मृत्यू झाला.

मयत बाबारावचे आजोबा बिटू पाटोळे यांच्या फिर्यादीवरून रवी कांबळे याच्या विरोधात भादा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तयनंतर पोलिसांनी त्याला अटक केली व न्यायालयासमोर हजर केले असता रवी कांबळे याला ११ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास भादा पोलिस ठाण्याचे सपोनी विलास नवले हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या