24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्राइमदिव्यांग अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दिव्यांग अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एकमत ऑनलाईन

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील गावात सहावीत शिकणा-या १३ वर्षीय दिव्यांग आणि भोळसर मुलीवर वारंवार बलात्कार झाल्याची घृणास्पद घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे, मुलगी गरोदर राहिल्यामुळे प्रकरणाला वाच्यात फुटली.

या प्रकरणी वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपी महिला शुभांगी अमोल कुचेकर हिला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. नोव्हेंबर२०२१ ते एप्रिल २०२२ या कालावधीत वारंवार हा बलात्कार करण्यात आला. शुभांगी कुचेकर ही महिला सहावीत शिकणा-या या मुलीला गोड बोलून फिरायला न्यायची आणि गाडीतून आलेल्या अनिल नलावडेबरोबर पाठवायची असा हा प्रकार घडला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या