26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्राइमपतीचा पत्नीवर कोयत्याने हल्ला

पतीचा पत्नीवर कोयत्याने हल्ला

एकमत ऑनलाईन

यवतमाळ : लागोपाठ मुली झाल्या म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्याआधी त्याने नायलॉनच्या दोरीने गळा आवळून आधी पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पण पत्नीने पतीच्या हल्ल्याला हुसकावून लावत विरोध केला. अखेर पतीने थेट कोयताच हातात घेतला आणि पत्नीवर वार केले.

यामध्ये पत्नीच्या मानेला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून पत्नी या हल्ल्यामध्ये रक्तबंबाळ झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे खुद्द पतीनेच यानंतर पोलिस स्थानक गाठले आणि आपण काय केले, याची कबुलीही पोलिसांसमोर दिली. पतीनेच सांगितलेला सगळा किस्सा ऐकून पोलिसही चक्रावून गेले. ही धक्कादायक घटना उघडकीस येण्याआधी पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. नेहमीचे वाद, त्यानंतर लागोपाठ झालेल्या दोन्ही मुलीच याचा राग मनात धरून पतीने पत्नीला संपवण्यासाठी हे संतापजनक कृत्य केले.

ही घटना यवतमाळ जिल्ह्यामधील पार्डी बंगला इथे घडली. लागोपाठ दोन मुली झाल्याच्या कारणातून पती शिवाजी चव्हाण नेहमीच पत्नी जयश्रीसोबत वाद घालत तिला मारहाण करायचा. दरम्यान अशाच वादातून त्याने तिला सुरुवातीला नायलॉन दोरीने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या