सोलापूर: दारू पिऊन येऊन महिलेस मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात मंद्रूप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नाईक नगर तांडा, वडकबाळ (ता. द. सोलापूर) येथे घडली.
रेश्मा महादेव जाधव (वय २७) या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून धर्मा
कृष्णा जाधव (वय ३०), काशीबाई धर्मा जाधव (वय ४०), जयश्री रमेश राठोड (वय ४५) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत सविस्तर असे की, ७ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता फिर्यादी व सासू शांताबाई, जाऊ जयश्री हे तिघे जण घरासमोर बसले होते. याचवेळी धर्मा जाधव याने दारू पिऊन येऊन
फिर्यादीस शिवीगाळ करत असताना शिव्या का देतो असे विचारल्याच्या कारणावरून मारहाण केली. याचवेळ सासू व जाऊ या सोडविण्यासाठी आल्या असता त्यांनाही दगडाने हाता पायावरून मारून जखमी केले.या घटनेची नोंद मंद्रुप पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास कॉंस्टेबल आसादे हे करीत आहेत.