23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeक्राइमशेतातून तब्बल ५ टन गांजा जप्त

शेतातून तब्बल ५ टन गांजा जप्त

एकमत ऑनलाईन

अहमदनगर : े जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात पोलिसांनी चक्क उसाच्या शेतातून ५ टन गांजा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत ही तब्बल ५० लाख रुपये इतकी आहे. गांजा जप्त करण्यासह पोलिसांनी २ महिलांनाही ताब्यात घेतले आहे.

पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी शिवारात ऊसाच्या शेतात गांजा ठेवण्यात आला होता. पोलिसांना शेतात गांजा लपवल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे आणि पाथर्डी पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये सोनई पोलिस स्टेशन आणि शनी शिंगणापूर पोलिस स्टेशनच्या कर्मचा-यांनीदेखील मदत केली. याशिवाय या गांजाची राखण करणा-या २ महिलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सुगंधित सुपारी, गुटखा तसेच गांजा यावर राज्यामध्ये बंदी घातलेली असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा सापडल्याने परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. या गांजाच्या विक्रीमागे मोठी टोळी तर कार्यरत आहे का याचा तपास पोलिस करत आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या