नांदेड : मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो म्हणून एका शिक्षकास अंंतरराज्य टोळीकडून १० लाख रूपये घेवून गंडविल्याची घटना घडली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने संगणमत करून दत्ता लक्ष्मण खानझोडे वय ५० वर्षे या व्यवसायायने शिक्षक असलेल्या पालकाकडुन त्यांच्या मुलाला वैद्यकीय प्रवेश मिळण्यासाठी अंतरराज्य टोळीकडुन निनावी फोन आला. १० लाख रूपये द्या तुम्हाला नामवंत वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात येईल. असे म्हणून सदर आरोपीने पैसे भरण्यासाठी आपला खाते नंबर खानझोडे यांना दिला.
त्यांनी ३१ डिसेंबर रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पावडेवाडी येथील त्या इसमाच्या खात्यावर १० लाख रूपये जमा केले. व प्रवेश देण्याबाबत विचारपुस केली असता त्यांनी सुरूवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिली आपली फसवणूक झाली असल्याचे त्या शिक्षकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.
या घटनेचा पुढील तपास सपोनि डोके हे करीत आहेत. सदर टोळी ही कोलकाता येथील असावी, असा अंदाज सहा. पोलिस निरिक्षक डोके यांनी व्यक्त केला आहे. घटनेबाबत अद्याप आरोपीला अटक झाली नसुन पोलिस कसून चौकशी करीत आहे.
काजोलच्या आगामी ‘त्रिभंग’चा ट्रेलर रिलीज