जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व लंडनमधील नाईट क्लबमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला. या सर्व लोकांचा मृत्यू का झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रविवारी पहाटे सीनरी पार्कमधील एनोबेनी टॅव्हर्नमध्ये ही घटना घडली. एखाद्या प्रकारचे विष प्राशन केल्यामुळे लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. परंतु, नेमके कारण समजू शकल्े नाही. ‘डेली डिस्पॅच न्यूज’च्या पोर्टलनुसार, पूर्व लंडनच्या केप प्रांताच्या काठावर असलेल्या सीनरी पार्कमधील एनोबेनी टॅव्हर्न इथे रविवारी पहाटे ही घटना घडली.
ईस्टर्न केप पोलिसांचे प्रवक्ते ब्रिगेडियर टेम्बिकोसी किनाना यांनी सांगितले की, मृतांमध्ये १८ ते २० वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. नाईट क्लबच्या केबिनमध्ये १७ लोक मृतावस्थेत आढळले. आज पहाटे या घटनेची माहिती आम्हाला मिळाली. घटनेच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा तपास केला जात आहे. क्लबमध्ये सर्वत्र मृतदेह आढळून आले, परंतु कोणाच्याही अंगावर जखमेच्या खुणा नाहीत.