22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeक्राइम5 आरोपींना अटक : बदला घेण्यासाठी 3 वर्षांच्या चिमुरडीची हत्या

5 आरोपींना अटक : बदला घेण्यासाठी 3 वर्षांच्या चिमुरडीची हत्या

एकमत ऑनलाईन

आग्रा : एका व्यक्तीने केलेल्या अपमानाचा राग मनात ठेवत त्या माणसाच्या तीन वर्षांच्या चिमुरडीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आग्रामध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच आपण तीन वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. विनीता, अमन ठाकूर, करुण, बुधपाल आणि कालीचरण अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 24 तासांमध्ये खुनाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

दातोली गावातील हृदयेश गुप्ता यांच्या तीन वर्षांच्या किंजल नावाच्या मुलीला गावातील तरुणी विनीता खाऊ देण्याच्या बहाण्याने सोमवारी घेऊन गेली. त्यानंतर किंजल बेपत्ता झाली. तिच्या वडिलांनी मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी शोध घेतल्यावर रोत्री 12 वाजता किंजलचा मृतदेह गावाबहेर झुडुपात फेकलेला आढळला. पोलिसांनी याचा तपास करण्यास सुरुवात केली.

किंजलला खाऊ देणाऱ्या विनीताला ताब्यात घेत तिची चौकशी केली असता, तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने घटनेची कबुली दिली. हृदयेश यांनी आपल्याला गावातील अमन ठाकूरसोबत पाहिले. याचा त्यांना राग आला. त्यांनी अमनचा अपमान केला. या घटनेनंतर अमनने हृदयेश यांचा बदला घेण्याचे ठरवले. हृदयेश आपल्या मुलीची बदनामी करत आहे, असे विनीताच्या कुटुंबियांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी अमनला साथ देण्याचे ठरवले. हृदयेश यांनी केलेल्या अपमानाच बदला घेण्यासाठी आरोपींनी किंजलची हत्या करण्याचा कट रचला. हृदयेश त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीला खाऊच्या बहाण्याने आपण घेऊन ओलो. त्यानंतर तिचा गळा आवळून खून केल्याचे विनीताने सांगितले. त्यानंतर गावाबाहेरील झुडुपात तिचा मृतदेह फेकून दिला. विनीताने दिलेल्या कबुलीनंतर पोलिसांनी पचजणांना केली.

Read More  रशियाने केली ऑगस्टच्या मध्यापर्यंत लस उपलब्ध करून देण्याची तयारी

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या