17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeक्राइम१७ किलो सोन्यासह ९ लाख लुटले

१७ किलो सोन्यासह ९ लाख लुटले

एकमत ऑनलाईन

चूरु : राजस्­थानमधील चूरु शहरातील सोने तारण ठेवून कर्ज देणा-या कंपनीच्­या कार्यालयात फिल्­मीस्­टाईल चोरीने एकच खळबळ उडाली. चौघेजण कर्जदार म्­हणून कंपनीच्­या कार्यालयात आले. त्­यांनी अवघ्­या १२ मिनिटांत कार्यालयातील १७ किलो सोने व ८.९२ लाखांची रोकड लंपास केली. मात्र सतर्क पोलिसांनी अवघ्­या तीन तासात या चोरट्यांच्या मुसक्­या आवळल्­या. लंच टाईमवेळी चार तरुण कार्यालयात आले. कोरोनामुळे त्­यांनी मास्­कबरोबर चेहरेही झाकले असावेत, असा कयास कर्मचा-यांनी व्­यक्­त केला.

यावेळी एका तरुणाने सोने तारण ठेवून कर्ज घेणार असल्­याची माहिती दिली. यानंतर चौघाही चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून कार्यालय आतून बंद केले. मोबाईल फोन हिसकावून घेत सर्व कर्मर्चा­यांना बाथरुममध्­ये कोंडले. यानंतर तब्­बल १७ किलो सोने आणि ८.९२ लाख रुपयांची रोकड ताब्­यात घेवून चोरटे दुचाकीवरुन पसार झाले.

लस घेतल्यानंतर २६ हजार जणांवर गंभीर साईड इफेक्ट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या