27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeक्राइमगुजरातमधील मुलाने ४० देशातील २५ हजार लोकांना गंडवले

गुजरातमधील मुलाने ४० देशातील २५ हजार लोकांना गंडवले

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : शुक्रवारी अहमदाबादच्या क्राईम ब्रँचने बारावी पास असलेल्या एका अट्टल सायबर गुन्हेगाराला अटक केली आहे. या २१ वर्षीय गुजराती मुलाने ४० देशातील तब्बल २५ हजार परदेशी लोकांना गंडवले आहे. आरोपीचं नाव हर्षवर्धन परमार असून पोलिसांच्या जाळयात अडकण्यापूर्वी तो चैनीचे जीवन जगत होता. हर्षवर्धन एका कामगाराचा मुलगा असून ते नारायण नगरमध्ये राहायचे. त्याची आई पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये सुईन म्हणून काम करते.

ऐषोआरामात जगण्यासाठी हर्षवर्धनने डार्क वेबचा आधार घेतला. या माध्यमातून तो सहजपणे पैसे कमावत होता. तो वस्तू खरेदी करण्यासाठी क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करायचा आणि याच वस्तू पुन्हा विकायचा. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने तीन महिन्यांच्या कालावधीत ५ कोटी रुपये कमावले होते. पाकिस्तानचा नागरिक झीया मुस्तफा याने त्याला कार्ड घोटाळा करण्यास शिकवले होते. यासाठी त्यांना एका रशियन हॅकर्सचीही मदत मिळाली होती. आरोपी क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहिती घ्यायचे.

जेथे डिजिटल व्यवहारासाठी ओटीपी मागितला जात नाही, अशा देशातील नागरिकांना हर्षवर्धनने लक्ष्य केले. अहमदाबादमधून डार्क वेबसाठी इंटेरनेटचा वापर होत असल्याचे सायबर सेलच्या निदर्शनास आले. त्यानंतर अहमदाबाद क्राईम ब्रँचने सापळा रचून हर्षवर्धन परमारला पकडले. आरोपी क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहिती मिळवायचे. याचा वापर करुन ते महागडया वस्तू खरेदी करायचे आणि याच वस्तू पुन्हा विकून रोख रक्कम मिळवायचे.

एका वरिष्ठ अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कार्डधारकाच्या अकाऊंटमध्ये असलेले पैसे आणि कोणत्या देशातील बँक आहे़ यानुसार रशियन हॅकर्सला प्रत्येक माहितीसाठी कमाल १०० डॉलर दिले. रशियन हॅकर्सकडून माहिती मिळाल्यानंतर तो क्रेडिट आणि डेबिट कार्ड माहिती गोळा करायचा. यासाठी हर्षवर्धनला पाकिस्तानी नागरिक मदत करत होता.

कोरोनाचा डोळ्यांसह डोकेदुखीची समस्या वाढली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या