23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeक्राइमअश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याने तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याने तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

नाशिक : नाशिकमधूनधक्कादायक माहिती समोर येत असून शहरातील एका तरुणीवर वारंवार अत्याचार करून अश्लील फोटो नातेवाईकांना शेअर केल्याची घटना घडली आहे. शिवाय संबंधित तरुणीच्या होणा-या नव-याला देखील अश्लील फोटो, व्हिडिओ सेंड केल्याने तरुणीचे ठरलेले लग्न मोडले आहे. या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक शहरातील नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भात नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयिताने तरुणीस विवाहाचे आमिष दाखवुन वारंवार शारिरीक सबंध ठेवण्यात आले. यावेळी तरुणीचे अश्लील फोटो व व्हिडीओ मोबाइर्लमध्ये काढुन शारिरीक सबंधाकरीता वारंवार तगादा लावला.

संशयित विश्वनाथ साईनाथ चव्हाण हा तरुणीला २०२० पासून ओळखत होता. त्यानंतर ओळखीच्या माध्यमातून संशयित चव्हाण याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवित तरुणीच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. याचदरम्यान त्याने छुप्या पद्धतीने कॅमेरा लावून अश्लील चित्रण केले. दरम्यान संशयित चव्हाण याने नंतरच्या काळात तरुणीला ब्लॅकमेल करीत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यावेळी पीडितेने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर आई-वडिल व नातेवाईकांना पीडितीचे अश्लील फोटो व व्हिडीओ पाठविण्याची धमकी दिली.

दरम्यान ऑगस्टच्या २८ तारखेला पीडितेच्या साखरपुड्याच्या कार्यक्रम असताना संशयित चव्हाण याने लग्न ठरलेल्या तरुणाला अश्लील फोटो पाठवले. या प्रकाराने तरुणीचे ठरलेले लग्न मोडल्याने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र संशयित फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर पीडितेने शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून राहत्या घरी फिनेल पिवुन जीव संपविण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान संशयित चव्हाण आणि पीडितेचे वडील हे एकाच ठिकाणी नोकरीला असल्याने या दोघांची ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने संशयिताने प्रेमसंबधादरम्यान संशयिताने अश्लील फोटो व्हिडीओ काढून तरुणीच्या नातेवाईकांना पाठविले. यामुळे तरुणीला शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. तसेच लग्नही मोडल्याने नैराश्यातून तरुणीने फिनाईल पिऊन स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या