34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeक्राइमगर्लफ्रेण्डसाठी जीवाभावाच्या मित्राची दगडाने ठेचून हत्या

गर्लफ्रेण्डसाठी जीवाभावाच्या मित्राची दगडाने ठेचून हत्या

एकमत ऑनलाईन

अनूपपूर : प्रेमात पडलेली व्यक्ती कधी काय करेल, हे काही सांगता येत नाही. आपल्या गर्लफ्रेन्डला खूश करण्यासाठी एका युवकाने गंभीर गुन्हा केला आहे. त्याने गर्लफ्रेन्डला महागडं गिफ्ट देता यावे, यासाठी आपल्या जीवाभावाच्या मित्राची दगडाने ठेचून हत्या केली आहे. त्यानंतर आरोपी युवकाने आपल्या मित्राकडील दागिने आणि इतर मुद्देमाल हडपून फरार झाला होता. चोरी केलेल्या पैशातून त्याने प्रियसीला महागडं गिफ्ट दिले मात्र त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. पोलिसांनी गुन्ह्याची कसून चौकशी केल्यानंतर आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

संबंधित घटना छत्तीसगडच्या भालूमाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आरोपी आसिफ खानने १ फेब्रुवारी २०२१ रोजी आपला मित्र राहुलकडून काही दागिने आणि मोबाइल लुटला. त्यानंतर त्याच्यावर दगडाने जोरदार हल्ला केला. त्यानंतर त्याला तिथेच टाकून पळ काढला. यानंतर काही लोकांनी जखमी राहुला पाहिलं आणि त्यांनी बिलासपूरच्या युनिटी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच २१ मार्च रोजी राहुलचा मृत्यू झाला आहे.

राहुलच्या मृत्यूनंतर त्याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्लाचे गूढ कायम होते. पण या घटनेचा तपास करत असताना, राहुलला सर्वात शेवटी त्याचा मित्र आसिफ खानसोबत पाहिले गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आसिफला चौकशीसाठी बोलावले. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आसिफने पोलिसांना सांगितले की, आपल्या प्रियसीला महागडे गिफ्ट देऊन खूश करण्यासाठी त्याने मित्र राहुलची हत्या केली.

राज्यभरात तापमान चढेच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या