18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeऔरंगाबादफेसबुकवर भेटलेल्या प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीला संपवले

फेसबुकवर भेटलेल्या प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीला संपवले

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : विभक्त होऊन देखील पती सतत त्रास देत असल्याने पत्नीने पतीची निर्घुण हत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. पतीला मनसोक्त दारू पाजून त्यानंतर त्याच्यावर पोटात चाकूने वार करीत पत्नीने त्याचा काटा काढला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

तब्बल बारा दिवसांनंतर या खुनाला वाचा फुटली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे आरोपी महिलेने पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी फेसबुकवर भेटलेल्या प्रियकराची मदत देखील घेतली होती. विजय संजयकुमार पाटणी (३५, रा. एन-६, सिडको) असे मृताचे नाव असून, पत्नी सारिका विजय पाटणी (३०, रा. सलामपुरेनगर, वडगाव कोल्हाटी) आणि तिचा प्रियकर सागर मधुकर सावळे (२५ रा. शिवाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय आणि सारिका या दोघांमध्ये पटत नसल्याने त्यांनी चार महिन्यांपूर्वी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विजय त्याच्या वृद्ध आईसह आणि सारिका तिच्या आई व भावासह राहू लागले होते. यादरम्यान, सारिकाची फेसबुकवरून सागरशी ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. याबाबत विजयला कळाले आणि तो सारिका सतत त्रास देऊ लागला. तसेच पुन्हा एकत्र राहण्याचा हट्ट करायला लागला. यादरम्यान सारिकाने विजयचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले.

१८ ऑक्टोबरला सारिकाने विजयला फोन केला आणि सोबत फिरायला जाण्यासाठी गळ घातली. त्यापूर्वीच तिने चाकू आणि डोळ्यात मारायला स्प्रे खरेदी केला होता. विजयला सारिकाने जास्तीची दारू पाजली. दरम्यान दोघे नवीन धुळे-सोलापूर हायवेवर वाल्मीजवळील उड्डाणपुलाजवळ पोहचले. ठरल्याप्रमाणे सारिकाने विजयच्या डोळ्यात स्प्रे मारला. तो गांगरला की लगेचच चाकूने सपासप त्याच्या पोटात वार केले.

प्रियकराला घटनास्थळी बोलावून घेतले….
सारिकाने केलेल्या चाकू हल्ल्यात विजय जागेवर कोसळला. त्याला काहीसे बाजूला सारून तिने फेसबुकवर भेटलेल्या प्रियकर सागर सावळेला फोन लावला आणि त्याला घटनास्थळी बोलावून घेतले. मात्र घाबरलेल्या सागरने तिला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास नकार दिला होता. पण त्याला खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत, त्याच्या मदतीने सारिकाने विजयाचा मृतदेह स्त्याच्या कडेला असलेल्या गर्द झाडीत फेकून दिला. त्यानंतर तिने पोलिसात पती बेपत्ता असल्याची तक्रार देखील दाखल केली होती. मात्र पोलिसांच्या तपासात तिनेच आपल्या पतीचा खून केल्याचे समोर आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या