27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeक्राइमसाता-यात जादूटोणा करत तरुणीवर बलात्कार

साता-यात जादूटोणा करत तरुणीवर बलात्कार

एकमत ऑनलाईन

सातारा : साता-यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला असून बलात्काराआधी या तरुणीच्या डोक्यावरुन लिंबू फिरवून जादूटोणा करण्यात प्रयत्न झाला. ही धक्कादायक आणि संताप आणणारी घटना उघडकीस आल्यानंतर साता-यात हादरुन गेले आहे.

या प्रकरणी पीडित तरुणीने आपल्या तक्रारी खळबळजनक आरोप केला आहे. पीडित तरुणीने दिलेल्या आरोपांच्या आधारे आता पोलिसांनी एकावर गुन्हा नोंदवून घेतला असून पुढील तपास केला जातो आहे. तसंच संशयित आरोपी असलेल्या नराधमास अटकही करण्यात आलीय.
ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी सध्या केली जातेय. साता-यातल्या एका कॉलनीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. साता-यातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात या बलात्कार प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली असून अधिक तपास केला जातो आहे.

साता-यातल्या एका कॉलनीत मुक्तार नासीर शेख या तरुणाने एका तरुणीला एकटीला रुममध्ये नेलं. त्यानंतर तिच्या डोक्यावरुन लिंबू फिरवला आणि भुरळ पडून तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला. पीडित तरुणीने पोलिसांत आपल्या जबाबात या संपूर्ण प्रकाराचा थरकाप उडवणारा घटनाक्रम सांगितला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या