नगर : रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठेच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. रेखा जरे हत्याकांडाच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगून आल्यानंतर बोठेला महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. यानंतर आता बोठेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. तोफखाना पोलिसांनी याप्रकरणी बोठेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच न्यायालयाने त्याला ३० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सलग तिसºया गुन्ह्यात पोलिस बाळ बोठेची चौकशी करत आहेत.
प्रथम रेखा जरे हत्याकांड प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून फरार झालेल्या बाळ बोठेला हैदराबादमधून अटक करण्यात आली. याप्रकरणी त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. यानंतर त्याला विनयभंगाच्या दुसºया एका गुन्ह्यात कोतवाली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या गुन्ह्यातही त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र या न्यायालयीन कोठडीची मुदत संपत नाही तोवर बोठेविरोधात मंगल भुजबळ यांनी खंडणीचा तिसरा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी पारनेर न्यायालयात आणि जिल्हा न्यायालयात अर्ज करत चौकशीसाठी ताब्यात घेण्याची मागणी केली. यामुळे बोठे याला तोफखाना पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
लातूर वैद्यकीय महाविद्यालयासाठी पावणेचार कोटीचा निधी