अलवर : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवाडीमध्ये भाड्याच्या घरात राहणा-या बिहारमधील मजुराच्या कुटुंबीतील १७ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बेकायदा गर्भपातावेळी तिची प्रकृती खालावल्याने मृत्यू झाला. त्यामुळे हे प्रकरण उजेडात आले.
बलात्कारानंतर मुलगी गरोदर राहिली होती. अवैधपणे गर्भपात करण्यात आला होता. औषधांमुळे तिची प्रकृती बिघडली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांथलका येथील २५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. त्याच्या घरात पीडितेचे कुटुंब राहते.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी बेकायदा गर्भपात करणाºया परिचारिकेला ताब्यात घेतले आहे. तिची चौकशी करण्यात येत आहे. आरोपीचे गेल्या तीन-चार वर्षांपासून अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. यादरम्यान त्याने अनेकदा तिच्यावर बलात्कार केला. ती गरोदर राहिल्यानंतर बेकायदा गर्भपात करण्यासाठी तिला औषधं देण्यात आली. यामुळे तिची प्रकृती बिघडली. उपचारादरम्यान तिचा मंगळवारी मृत्यू झाला.
आगामी तिमाहीत जीडीपी सुधारण्याची शक्यता