23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeक्राइमबनावट सह्या करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न

बनावट सह्या करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

सोलापूर:दक्षिण सोलापूर तालुक्यातील चंद्रहाळ व हत्तूर येथील जमीन बळकावण्याच्या उद्देशाने बनावट सहीद्वारे वारस नोंद करण्याकरिता अर्ज केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

चंद्रशेखर महादेव बागदुरे, पंचप्पा मल्लिकार्जुन हिप्परगे (रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर), राहुल ऊर्फ संतोषकुमार चंद्रशेखर बागदुरे (रा. नरेंद्र नगर, सैफुल, विजापूर रोड, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राजशेखर महादेव बागदुरे (वय ६१) रा उत्तर कसबा बाळीवेस
सोलापूर) यांचे वडील महादेव तमण्णा बागदुरे यांनी मृत्यूपत्र करून ठेवले आहे. मृत्यूपत्रात चंद्रहाळ व हत्तूर येथील शेतजमीन राजशेखर बागदुरे व मयत भावाची पत्नी शारदा बागदुरे यांच्यात समान हिस्सा देण्यात यावा, असे लिहिलेले आहे.

राजशेखर यांचा मुलगा सिद्धेश्वर हा तलाठी कार्यालयात गेला असता, त्याला तिघे बनावट सही करून वारस नोंद करण्याचा अर्ज दिल्याचे समजले. हत्तूर येथील शेतजमीन बक्षीसपत्राद्वारे पुतण्या राहुल ऊर्फ संतोषकुमार चंद्रशेखर बागदुरे याच्या नावे केले आहे, अशी फिर्याद राजशेखर बागदुरे यांनी दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या