25.9 C
Latur
Wednesday, October 27, 2021
Homeक्राइमबाळ बोठेने कोठडीतून केले वकिलांना फोन

बाळ बोठेने कोठडीतून केले वकिलांना फोन

एकमत ऑनलाईन

अहमदनगर : रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या कोठडीत सापडलेल्या मोबाईलद्वारे त्याने काही वकिलांशी संपर्क केल्याचे तपासात उघड झाले आहे. या गुन्ह्यात बोठेला आरोपी केल्यानंतर पोलिसांनी आता त्या वकिलांकडे चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोठडीत फोन वापरण्यास बंदी आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय वकिलांना आरोपीशी संपर्क ठेवता येत नसतानाही हा संपर्क कसा झाला, याचा तपास पोलिस करणार असल्याचे सांगण्यात आले.

बोठे सध्या पारनेर उपकारागृहात असून तेथील कोठडीत सापडलेल्या दोन मोबाईलमधून बोठेने वकिलांना फोन केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्याने तीन कॉल केल्याचे आढळून आले आहे. बोठेवर याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोन्ही मोबाईलवरून झालेल्या कॉलची माहिती घेतली. बराकीतील आरोपींनी सुमारे ६० ते ७० कॉल केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यात बोठेने तीन कॉल केल्याचे आढळून आले. त्याने हे कॉल वकिलांना केल्याची माहिती समोर आली. बोठे याने कोणत्या वकिलांना व कशासाठी कॉल केले? त्यातून त्यांचे काय बोलणे झाले? याचा शोध घेतला जाणार असल्याचे निरीक्षकांनी सांगितले.

कायदेशीर मार्गदर्शनासाठी आरोपीला वकिलांशी संपर्क साधण्यासाठी न्यायालयाची परवानगी लागते. शिवाय कोठडीतून आरोपीला फोनद्वारे बाहेर संपर्क करता येत नाही, याची माहिती असूनही वकिलांनी बोठेशी कसा संवाद केला? याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अनेक आरोपींकडून मोबाईलवर संपर्क
मागील महिन्यात दोन आरोपींकडे दोन मोबाईल आढळून आले होते. याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आतापर्यंत आठ जणांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बोठे याला या गुन्ह्यात सहभागी करून घेण्यात आले आहे. आणखी काही आरोपींनी मोबाईलचा वापर केल्याचे समोर आले असल्याची माहिती पारनेरचे पोलिस निरीक्षक घन:श्याम बळप यांनी दिली.

तिस-या लाटेसाठी राज्याची तयारी – अजित पवार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या