26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeक्राइमनोकरीचे आमिष दाखवून तरुणींची फसवणूक

नोकरीचे आमिष दाखवून तरुणींची फसवणूक

एकमत ऑनलाईन

पुणे : नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने पश्चिम बंगालमधील दोन मुलींना पुण्यात आणून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी एकाला फरासखाना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला २३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मदी रेड्डी ऊर्फ बाबूजी ऊर्फ मदी मणी नायक (वय ४३, रा. बुधवार पेठ, मूळ रा. आंध्र प्रदेश) असे पोलिस कोठडी झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस उपनिरीक्षक श्रीधर खडके यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात दोन महिलांना अटक करण्यात आली असून, आणखी तिघांचा पोलिस शोध घेत आहेत.

आरोपीने पीडित मुलींच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन २०२० मध्ये त्यांना पुण्यात आणले. आरोपी मदी रेड्डी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात फरासखानासह पश्चिम बंगालमधील विविध पोलिस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी तसेच गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील अजिंक्य शिर्के यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या