24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeक्राइमबलात्काराची क्लिप मोबाईलवर पाठवत 2 लाख रूपयांची मागणी

बलात्काराची क्लिप मोबाईलवर पाठवत 2 लाख रूपयांची मागणी

एकमत ऑनलाईन

इस्लामपूर : बलात्काराची व्हिडीओ क्लिप संबंधित महिलेच्या मुलासह कुटूंबाला मोबाईलवर पाठवत 2 लाख रूपयांची मागणी करणाऱ्या तरुणाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवानसिंग राजपुत ठाकूर (वय २६ रा. बिदर, कर्नाटक) असे तरुणाचे नाव आहे.

कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी देत ठाकूर याने सतत 2 वर्षे महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. बलात्काराचा व्हिडीओ नातेवाईक व कुटूंबातील सदस्यांच्या मोबाईलवर टाकून बदनामी केल्याप्रकरणी पिडीत महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे.

जबरदस्तीने बलात्कार करत मोबाईलवर चित्रीकरण

पिडीत महिला व संशयीत आरोपी हा एका खासगी कपंनीत कामाला होते. पिडीत महिला ही कंपनीतील काम करत असताना तेथे प्रोडक्शन मॅनेजर असणाऱ्या भगवानसिंग रजपूत याने या महिलेच्या कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. यानंतर त्याने वेळोवेळी धमकी देत जबरदस्तीने बलात्कार करत मोबाईलवर चित्रीकरण केले. त्यानंतर २०१९ मध्ये आरोपी रजपूत हा नोकरी सोडून गेला.

महिलेच्या मोबाईलवर फोन करत दोन लाख रूपयांची मागणी

त्यानंतर त्याने मार्च २०२० मध्ये पिडीत महिलेच्या मोबाईलवर फोन करत दोन लाख रूपयांची मागणी केली. ते दिले नाहीस तर त्या व्हिडीओ क्लिप तुझ्या पती, मुलाच्या व इतर नातेवाईकांना पाठवून देवून बदनामी करण्याची धमकी दिली. यावेळी पिडीत महिलेने रजपूत याच्या खात्यावर सात हजार रूपये ऑनलाईन पाठवले. मात्र रजपूत हा पैशासाठी धमकी देवू लागला.

 महिलेला जास्तच त्रास देवू लागल्याने पिडीत महिलेने इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली

दरम्यान रजपूत याने पिडीत महिलेच्या पती, मुलगा व इतर नातवाईकांच्या मोबाईलवर व्हिडीओ क्लिप पाठवत पैशाची मागणी केली. यानंतर रजपूत हा पिडीत महिलेला जास्तच त्रास देवू लागल्याने पिडीत महिलेने इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास पोलिस करीत आहेत. ठाकूर या संशयीत आरोपीच्या विरूध्द इस्लामपूर पोलिस ठाण्यात बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Read More  मांजरांमध्ये कोरोनाचा विषाणू सापडल्याची पहिली केस ब्रिटनमध्ये सापडली

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या