24.7 C
Latur
Wednesday, January 20, 2021
Home क्राइम म्हणून पतीला खांद्यावर घेऊन गावभर फिरावं लागल

म्हणून पतीला खांद्यावर घेऊन गावभर फिरावं लागल

एकमत ऑनलाईन

घटनेतील ७ आरोपींना अटक करुन तात्काळ चौकशी सुरु केली : 

झाबुआ : मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल भागात प्रेम प्रकरणातून एका महिलेला शिक्षा दिल्याची घटना सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका महिलेला तिच्या पतीला खांद्यावर घेऊन गावात फिरवलं जात असल्याचं दिसून येते, त्यापाठोपाठ गावकरी महिलेला जबरदस्तीनं पुढे चालायला भाग पाडून जोरजोरात आरडाओरड करताना दिसत आहेत.

सोशल मीडियात व्हायरल होणाºया या घटनेबाबत पडताळणी केली असता ही पहिलीच घटना आहे असंही नाही यापूवीर्ही या जिल्ह्यात अशा घटना घडल्या आहेत. अशा घटनेचे अनेक व्हिडीओ, बातम्या यूट्यूबवर प्रसारित झाल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना छापरी रनवास या गावातील आहे, पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी या घटनेतील ७ आरोपींना अटक करुन तात्काळ चौकशी सुरु केली होती.

गावकरी तिच्या मागून नाचतगाजत त्यांची खिल्ली उडवत होते….
व्हायरल होणाºया व्हिडीओत दिसत होतं की, लोकं महिलेला धक्का देत आहेत, आणि तिला जबरदस्तीनं पतीला खांद्यावर बसवून गावात फिरवलं जात आहे. इतकचं नाही तर तिच्या पतीलाही त्यासाठी मजबूर केले जात आहे. गावकºयांंच्या दबावामुळे महिलेला पतीला खांद्यावर घेऊन गावभर फिरावं लागलं. महिला तिच्या पतीला खांद्यावर बसवून गावातील रस्त्यावर चालत राहिली तर गावकरी तिच्या मागून नाचतगाजत त्यांची खिल्ली उडवत होते.

पीडिताच्या तक्रारीनंतर ७ जणांविरोधात तक्रार दाखल
पीडित महिला आणि तिचा पती गुजरातमध्ये रोजंदारीचं काम करतात. पत्नीने अन्य व्यक्तीसोबत प्रेम प्रकरण सुरु असल्याचं पतीला संशय होता, कुटुंबाच्या लोकांनीही या शंकेच्या आधारे पीडितेसोबत अमानुष अत्याचार केले. झाबुला पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणाले की, पीडिताच्या तक्रारीनंतर ७ जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

मोबाईल कॅमेºया ही दृश्य कैद करण्यासाठी अनेकांची स्पर्धा
व्हायरल झालेला हा व्हिडिओ कुणी तयार केला याची माहिती नाही मात्र गदीर्तील कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियात व्हायरल केला. मात्र त्या महिलेच्या मदतीसाठी कोणीच पुढे सरसावलं नाही, झाबुआ कोतवाली पोलिसांनी ज्यावेळी हा व्हिडीओ व्हायरल झाला त्यानंतर घटनेची गांभीयार्ने दखल घेत व्हिडीओत दिसणाºया व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. जिल्ह्यात ही पहिलीच घटना नाही तर अशाप्रकारे यापूवीर्ही अमानुष अत्याचार झाले होते, मागील दीड महिन्यातलं हे दुसरं प्रकरण आहे. ज्यावेळी महिलेचा अशाप्रकारे अमानुष छळ होत होता त्यावेळी लोक तमाशा बघत होते, कोणीही या महिलेच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. मोबाईल कॅमेºया ही दृश्य कैद करण्यासाठी अनेकांची स्पर्धा सुरु होती अशी नाराजी पोलिसांनी व्यक्त केली.

Read More  भूमिपूजनाआधी राम जन्मभूमीचे पुजारी, 16 पोलीस कोरोना पॉजिटिव्ह

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या