कोल्हापूर : अवघ्या ३० वर्षीय डॉक्टर तरुणीने स्वत:च इंजेक्शनचा ओव्हर डोस घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीचे अपूर्वा प्रवीणचंद्र हेंद्रे (वय ३०) नाव असून तिचे वडीलही डॉक्टर आहेत.
कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्कातील डी मार्टजवळ तिचा मृतदेह आढळून आला. तिने आत्महत्या का केली? याबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही. डॉक्टर तरुणीने टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्याने हेंद्रे कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
डॉक्टर अपूर्वा कसबा बावड्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. शनिवारी रात्री त्यांनी मैत्रिणींसमवेत पार्टी केली होती. पार्टी करून झाल्यानंतर मध्यरात्री घरी परतल्या होता.
मात्र, मध्यरात्रीच घरात कोणालाही माहिती न देता त्या घरातून बाहेर पडल्या. त्यामुळे कुटुबियांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, काहीच थांगपत्ता न लागल्याने काळजीत पडलेल्या कुटुंबीयांनी मध्यरात्रीच शाहूपुरी पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.