31 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home क्राइम त्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

त्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

होशियारपूर : केंद्राने लागू केलेल्या तिन्ही कृषि कायद्यांना विरोध करण्यासाठी पंजाबमधील होशियारपुरमध्ये भाजपा नेत्याच्या घरासमोर शेणाने भरलेली ट्रॉली रिकामी करणा-या आंदोलकांविरोधात पोलिसांनी थेट हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी घडलेल्या या प्रकरणानंतर आंदोलकांवर करवाई करण्याची मागणी ज्यांच्या घरासमोर हा प्रकार घडला ते माजी मंत्री तीक्ष्ण सूद यांनी केली होती. या प्रकरणामध्ये होशियारपुर पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी खास चार सदस्यांची टीमही तयार करण्यात आल्याचे वृत्ते दिले आहे.

भारती किसान युनियन राजेवालचे नेत्यांनी या प्रकरणामध्ये आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी केली आहे. तातडीने हे गुन्हे मागे घेतले नाही तर सात जानेवारी रोजी जालंदरमधील रस्त्यांवर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिले आहे. तसेच सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही तर होशियारपूरमध्ये जो शेणाची ट्रॉली मंर्त्याच्या घरासमोर रिकामी करण्याचा प्रकार घडला तोच पुन्हा अनेक ठिकाणी पाहायला मिळेल असा इशाराही संघटनेने दिला आहे.

तक्रारीत काय म्हटले आहे?
या प्रकरणामध्ये भाजपाचे जिल्हा सचिव सुरेंद्र पाल भट्टी यांनी तक्रार दाखल केली आहे. आपण एक जानेवारी रोजी सूद यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी जात असतानाच आंदोलकांनी ट्रॉलीमधून शेण आणून सूद यांच्या घरासमोर टाकले. यावेळी या आंदोलकांकडे हत्यारंही होती, असेही भट्टी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या आंदोलकांनी सूद यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही भट्टी यांनी केला आहे़ तसेच ट्रॅक्टर चालकाने सूद आणि त्यांच्या मित्रांवर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न केल्याचेही भट्टी यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

सेंट्रल विस्ता चा मार्ग मोकळा – संसदेच्या नव्या इमारतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,414FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या