24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्राइमरत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती बेपत्ता ; पतीकडून घातपाताचा संशय

रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती बेपत्ता ; पतीकडून घातपाताचा संशय

एकमत ऑनलाईन

रत्नागिरी : रत्नागिरीच्या पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत मागील १० दिवसांपासून बेपत्ता आहेत. या प्रकरणी संशयित म्हणून उप तालुकाप्रमुख असलेल्या त्यांच्या पतीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे समजते. स्वप्नाली सावंत यांचा मोबाईल पतीकडे मिळाल्याने संपूर्ण प्रकरणात पतीवरील संशय अधिक बळावला आहे.

माहितीनुसार, काल दिवसभर पोलिसांकडून रत्नागिरी शहराच्या आसपासच्या परिसरात श्वान पथकाच्या मदतीने शोध घेण्यात आला होता. १ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास कोणालाही न सांगता सावंत अचानक बेपत्ता झाल्या होत्या. मात्र आता या प्रकरणात पतीची पोलिस कसून चौकशी करीत आहेत. स्वप्नाली सावंत अचानक बेपत्ता झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सुकांत सावंत यांचे पती शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख आहेत. माजी सभापती स्वप्नाली सावंत अचानक बेपत्ता झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यांचा शोध सुरू असतानाच आता पोलिसांनी त्यांचे पती सुकांत सावंत यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे. या प्रकरणी लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या