28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्राइमबुलडाण्यात माजी सरपंच हनी ट्रॅपमध्ये अडकला ; महिलेसह सहा जणांना बेड्या

बुलडाण्यात माजी सरपंच हनी ट्रॅपमध्ये अडकला ; महिलेसह सहा जणांना बेड्या

एकमत ऑनलाईन

बुलडाणा : सध्या हनी ट्रॅपचे प्रकार वाढत चालले आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून हनी ट्रॅप करत पैशांची मागणी करण्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना बुलडाणा जिल्ह्यातून समोर आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील एका गावातील माजी सरपंचाला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा प्रकार समोर आला आहे.

या माजी सरपंचाला एका महिलेने फोन करून एका निर्जन स्थळी बोलावून घेतले. यानंतर त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या इतर पाच जणांना सरपंचाला मारहाण केली. शिवाय आम्ही तुझे आता व्हिडीओ काढले असून ते समाज माध्यमात व्हायरल करु असं सांगत आताच एक लाख रुपये दे, असा दम दिला. सोबतच यावेळी सरपंचाच्या जवळील पाच हजार रुपये घेतले आणि पळून गेले.

या घटनेनंतर सरपंचाने बुलडाणा शहर पोलिसात तक्रार दाखल केली. सरपंचाने दिलेल्या तक्रारीवरून काही तासातच पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. विशेष म्हणजे अलीकडे बुलढाणा परिसरात असे प्रकार वाढले असून या प्रकाराला बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यातील एका गावच्या माजी सरपंचाने ही तक्रार शहर पोलीस ठाण्यात केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, त्यांना एका महिलेने फोन करून बोलवले व आपल्या जाळ्यात ओढले. तिथे दडून बसलेल्या चार ते पाच युवकांनी या दोघांना तिथेच घेरले. एक लाख रुपयांची मागणी करत सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

तक्रार मिळताच पोलिसांच्या डीपी पथकातील टीमने अवघ्या काही तासातच या ५आरोपीसह २३ वर्षीय सदर महिलेला ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. य्

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या