34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeक्राइमविद्यार्थिनीवर गँगरेप; पीडितेची आत्महत्या

विद्यार्थिनीवर गँगरेप; पीडितेची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

मेरठ : उत्तर प्रदेशमधील सरधना कोतवाली परिसरातील पोलिस ठाण्यात एका खेड्यात टयूशनहून घरी परत येत असलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यावर खेड्यातीलच चार तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. दुखापत झालेल्या मुलीने घरी पोहोचल्यानंतर विषारी पदार्थ सेवन केले असून रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. शुक्रवारी पोलिसांनी ही माहिती दिली. एसपी देहात केशव कुमार यांनी सांगितले की, गुरुवारी झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेत चार तरुणांचा सहभाग होता.

पुढे ते म्हणाले की, विद्यार्थिनीची सुसाईड नोट घरातून जप्त करण्यात आली असून विद्यार्थिनीने लखन आणि विकास उर्फ मुरली यांचा उल्लेख केला आहे. कुमार म्हणाले की, त्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून अन्य दोन आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे सरधना पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या कुटूंबियांच्या तक्रारीच्या आधारे पीडित अल्पवयीन दहावीत शिकत होती असून, गुरुवारी ती घरून शिकवणी शिकण्यासाठी गेली होती. शिकवणीतून परत येत असताना मुलीला कपसड गावात राहणाºया चार तरुणांनी पळवून नेले आणि टॉवरजवळील घरात सामूहिक बलात्कार केला.

गुजरात विधानसभेत लव्ह जिहाद विधेयकाला मंजूरी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या