25.4 C
Latur
Monday, March 1, 2021
Home क्राइम रेल्वेस्थानक परिसरात महिलेवर गँगरेप

रेल्वेस्थानक परिसरात महिलेवर गँगरेप

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमधील एका रेल्वे स्थानकाच्या परिसरात महिलेवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीतील शकूर बस्ती रेल्वे स्थानकात बसलेल्या महिलेसोबत गुरुवारी रात्री ही घटना घडली आहे. पीडित महिला २२ वर्षीय असून, तिच्यावर तिघांनी अत्याचार केला आहे. आपल्या परिवारासोबत वाद झाल्यावर पीडित महिला रागाने घरातून निघाली आणि शकूर बस्ती रेल्वे स्थानकावर येऊन बसली होती.

एकट्या महिलेला पाहून तीन आरोपींनी तिला प्लॅटफॉर्मवरुन जवळच असलेल्या झाडी-झुडपात नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली आहेत. पीडित महिला रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या परिसरात राहते. आपल्या कुटुंबासोबत तिचा वाद झाल्यानंतर ती रागाने घरातून निघून आली आणि रेल्वे स्थानकात बसली होती. रेल्वे स्थानकात एकटी बसल्याचे पाहून तिघेजण तिच्याजवळ आले.

कृषि कायद्यांवरुन केंद्र सरकारची कोंडी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या