रांची : पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेने देशवासीयांची मान लज्जेने खाली झुकली आहे. झारखंडमध्ये मंगळवारी ८ डिसेंबर रोजी दुमका जिल्ह्यातील घांसीपूर गावात एका महिलेवर १७ जणांनी सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी महिलेच्या पतीला बांधून त्यांच्यासमोरच त्यांच्या पत्नीवर अत्याचार केले. यानंतर सर्व आरोपी फरार आहेत.
१७ आरोपींपैकी आतापर्यंत केवळ एकाच आरोपीची ओळख पटली आहे. या आरोपीचे नाव रामू मोहली (गोलपूर) असे आहे. असे असले तरी अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही. या घटनेने संपूर्ण राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दुमकाचे पोलिस उप महासंचालक सुदर्शन प्रसाद मंडल म्हणाले, पीडित महिलेने सामूहिक बलात्कारीची तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल होताच तपास सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे वय ३५ वर्षे असून त्यांना ५ मुले आहेत.
इस्रायलमध्ये २७ डिसेंबरपासून लसीकरण