कानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात तरुणाच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. बर्थडे गिफ्ट देण्यासाठी घरी बोलावून दुस-या प्रियकराच्या आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने तरुणाची मफलरने गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर तरुणाच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. प्रेयसीने दुस-या प्रियकराच्या मदतीने कारमध्ये मृतदेह ठेवला आणि सीटीआय नाल्याजवळ ती कार पार्क करून आरोपी पसार झाले.
पोलिसांनी या घटनेचा छडा लावून दोन आरोपींना अटक केली आहे. रेल बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत शांती नगर क्रॉसिंगजवळ राहणा-या आशू यादववर शहरातील अनेक पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल होते. आशूचा विवाह सात वर्षांपूर्वी गोरखपूरच्या ज्योतीसोबत झाला होता. आशू पत्नी ज्योती, मुले रिया आणि शुभ तसेच आई मालतीसोबत राहत होता. आशूचा मृतदेह दोन जानेवारी रोजी कारमध्ये सापडला होता. १ जानेवारीला त्याला वाढदिवस होता. आशूची प्रेयसी दिपिका शुक्ला हिने ३१ डिसेंबरला रात्री दोन वाजता त्याला फोन करून बर्थडे गिफ्ट देण्यासाठी बोलावले होते.
वर्षा राऊत यांना पुन्हा ईडीकडून समन्स