31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeक्राइमबायकोमुळे १५ वेळा भोगला तुरुंगवास

बायकोमुळे १५ वेळा भोगला तुरुंगवास

एकमत ऑनलाईन

बैतूल : लग्नानंतर नवरा-बायकोंमधील भांडणे ही परिस्थितीमुळे, घरच्यांच्या मध्यस्थीने किंवा मुलाकडे पाहून अनेकदा मिटतात. घटस्फोटासाठी दाखल केलेली केस देखील कौन्संिलगच्यामार्फत सोडवण्याचा कोर्टाचा सुरुवातीला प्रयत्न असतो. मात्र बायकोच्या तक्रारीमुळे नव-याला १५ वेळा जेल जावे लागले असेल तर ते जोडपं पुन्हा एकत्र नांदण्याची शक्यता नसते. जेलवारीला कारणीभूत ठरलेल्या बायकोसोबत पुन्हा राहण्यास तयार होण्याची नव-याचे उदाहरण अगदीच क्वचित असेल.

मध्य प्रदेशातील बैतूल जिल्हा कोर्टात एक असाच अजब प्रसंग घडला. तब्बल ११ वर्ष वेगळे राहिलेल्या जोडप्यांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातल्या आणि ते परस्परांसोबत नांदायला तयार झाले. ममता आणि चंद्रशेखर साहू असे या जोडप्याचे नाव आहे. ममताने चंद्रशेखरच्या विरुद्ध २००९ साली घरगुती छळ आणि हुड्यांची मागणी या दोन आरोपांखाली केस दाखल केली होती. या प्रकरणात गेल्या ११ वर्षात १५ वेळा चंद्रशेखरला जेलमध्ये जावे लागले आहे.

नॉन हॉकर्स झोन, हॉकर्स झोन झाले कसे?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या