25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeक्राइमबंगळुरात ऑनर किलिंग : वडील व चुलत भावांकडून मुलीची हत्या

बंगळुरात ऑनर किलिंग : वडील व चुलत भावांकडून मुलीची हत्या

एकमत ऑनलाईन

बंगळूर : दुस-या जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून एका तरुणीची तिच्या वडिलांनी आणि दोन चुलत भावांनी मिळून हत्या केली. बंगळुरूपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या रामगनाग्रा जिल्ह्यात ही घटना घडली. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सुरुवातीला तरुणी बेपत्ता असल्याची नोंद केली होती. पण नंतर ऑनर किलिंगची ही घटना असल्याचे सांगितले.

नऊ ऑक्टोबरला मुलीच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. ती बी. कॉमच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. तक्रार नोंदवल्यानंतर दुसºया दिवशी तक्रारदाराच्या भावाच्या शेतात मुलगी मृतावस्थेत आढळली. ‘पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी तिघांनी हत्येचे कारस्थान रचले होते. आठ आॅक्टोबरला तिघांनी मिळून मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह शेतात पुरला. दुसºया दिवशी आरोपी असलेल्या मुलीच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली’’ अशी माहिती पोलीस महानिरीक्षक सिमंत कुमार सिंह यांनी दिली.

‘‘घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी २१ सदस्यीय पथकाची स्थापना केली होती. १० ऑक्टोबर रोजी मुलीचा मृतदेह सापडला. कुटुंबासमोर मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकांच्या चेहºयावर कुठलेही दु:खाचे भाव दिसले नाहीत. पोलिसांनी या प्रकरणी कसून चौकशी केल्यानंतर हे ऑनर किलिंगचे प्रकरण असल्याचे समोर आले’’ रामगनाग्राचे एसपी गिरीश यांनी सांगितले.

कोरोना नियंत्रणासाठी सांगोला नगरपरिषदेकडून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेच्या ‘दुसऱ्या’ फेरीस प्रारंभ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या