26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्राइमकॅसल स्पामध्ये अवैध व्यवसाय मालकासह दोघांना अटक, ५ महिलांची सुटका

कॅसल स्पामध्ये अवैध व्यवसाय मालकासह दोघांना अटक, ५ महिलांची सुटका

एकमत ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड : स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली आहे. यावेळी वेश्याव्यवसाय करणा-या ५ महिलांची सुटकाही करण्यात आली. पिंपळे सौदागरमध्ये जगताप डेअरीजवळ कॅसल स्पा येथे आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

याठिकाणी एक डमी ग्राहक पाठवून खरेच वेश्याव्यवसाय केला जातो का, हे पडताळून पाहण्यात आले. सापळा लावून वेश्याव्यवसायाचा गोरखधंदा पोलिसांनी उजेडात आणला आहे. या वेश्याव्यवसायाच्या जाळ्यातून पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर सीमा धोत्रे आणि रमेश साहिराम यांच्या विरोधात भादंवि आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, वाकड पोलिस स्टेशनच्या हद्दीत स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मुलींकडून अवैधरीत्या वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. सेंटरच्या मुलींना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती पालिसांना मिळाली. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून, सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या