22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्राइमबीडमध्ये अपंग अल्पवयीन मुलीवर पित्यानेच केला अत्याचार

बीडमध्ये अपंग अल्पवयीन मुलीवर पित्यानेच केला अत्याचार

एकमत ऑनलाईन

बीड : बीडच्या गेवराई तालुक्यातील रेवकी-देवकी येथे अपंग अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नराधम पित्याविरोधात गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रतन लक्ष्मण गोरे असे आरोपीचे नाव आहे. रतन गोरेने काल दुपारी आपल्या राहत्या घरी अपंग मुलीवर बलात्कार केला. पीडितेवर सुरुवातीला गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्याने तिला बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील निर्दयी बापाला गेवराई पोलिसांनी अटक केली.

गेवराई तालुक्यातील रेवकी-देवकी गावात घडलेली खरंतर बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना ऐकूनच माणसाला प्रचंड राग येईल. मात्र, अस्तित्वात ही घटना घडली आहे. दुर्दैवी म्हणजे अपंग मुलीवर अमानुष अत्याचार केल्याची घटना काल घडली. ही बातमी वा-यासारखी गावातच नव्हे तर जिल्हाभरात पसरली.

या घटनेवर नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात असून या नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. तर पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या