35 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeक्राइमरेखा जरे प्रकरणी सूत्रधार बोठेला संरक्षण कोण देतंय?

रेखा जरे प्रकरणी सूत्रधार बोठेला संरक्षण कोण देतंय?

एकमत ऑनलाईन

नगर : रेखा जरे यांच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठेला वाचविण्यासाठी कोणा मंत्र्याने ताकद तर लावली नाही ना, त्याला गो-बाय कोणी देत आहे का? या प्रकरणात खूप मोठे काही तरी घडविण्याची तर योजना नाही ना? असे प्रश्न जरे कुटुंबियांतर्फे उपस्थित करण्यात आले आहेत. जरे कुटुंबियांचे वकील सचिन पटेकर यांच्यामार्फत पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना हे निवेदन देण्यात आले आहे. या प्रकरणात नाव निष्पन्न झाल्यानंतर महिनाभरापासून अधिक काळ बोठे फरारी आहे. त्याचा कोणताही ठावठिकाणा पोलिसांना लागलेला नाही. त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिस सांगत असले तरी, प्रत्यक्षात त्यांना यश आल्याचे दिसून येत नाही. यासंबंधी जिल्ह्यात चर्चाही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जरे कुटुंबीयांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गुन्हा घडल्यापासून बोठे पसार झालेला आहे. त्याचा ठावठिकाणाही पोलिसांना सापडलेला नाही. हे प्रकरण राज्यभरात गाजत असताना त्याला कसला तरी गो-बाय देण्याचा प्रयत्न होत असल्याचे जाणवत आहे. बोठे याचा इतिहास पाहिला असता त्याला शासकीय वरदहस्त आहे का? त्यातून पोलिस यंत्रणेवर दबाव येतोय का? पोलिस यंत्रणा गोंधळली आहे का? पोलिसांतील काही अधिकारी बोठेला मदत करत आहे का? असे विविध प्रश्न चर्चिले जात आहेत.
या प्रश्नांची उत्तरे आतापर्यंत मिळू शकलेली नाहीत. याचा अर्थ असा की, मास्टरमाईंड असलेल्या बोठेने स्वत:च्याच नियंत्रणात सगळी परिस्थिती ठेवल्याचे दिसते.

तसेच गेल्या काही दिवसांपासून नागरिक स्वत:हून पोलिसांत जाऊन गुन्हा नोंदवत आहेत. जे त्याच्या भीतीपोटी समोर येण्यास तयार नव्हते, ते आज धाडस करून समोर येण्यास तयार झाले आहेत. पोलिसांनी फिर्यादीला संरक्षण दिलेले असले तरी, यापुढे जर बोठे सापडला नाही तर, पोलिस संरक्षणात जरे कुटुंबीय किती दिवस भीतीच्या वातावरणात जगणार? असा प्रश्नही निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे़

गरिबांना मोफत लसीची केंद्राकडे मागणी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या