35 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeक्राइमइंडिगोच्या मॅनेजरची गोळ्या घालून हत्या

इंडिगोच्या मॅनेजरची गोळ्या घालून हत्या

एकमत ऑनलाईन

पाटणा : विमान कंपनीच्या मॅनेजरच्या हत्याकांडाने बिहारची राजधानी पाटणा हादरली आहे. विमानतळावर कार्यरत असलेल्या इंडिगो विमान कंपनीच्या मॅनेजरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. रुपेश कुमार असे या व्यक्तीचे नाव आहे. कॉलनीच्या गेटवर गाडी आलेली असताना आरोपींनी गोळीबार केला. यात रुपेश कुमार गंभीर जखमी झाले होते. पाटणातील पुनाईचाक भागातील कुसुम विलास अपार्टमेंट येथे रात्री ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

इंडिगो एअरपोर्ट मॅनेजर असलेले रुपेश कुमार विमानतळावरून घरी येत होते. त्याची कार कॉलनीच्या गेटजवळ येताच काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. आरोपींनी कुमार यांच्या दिशेने तब्बल सहा राऊंड फायर केले. त्यानंतर आरोपी फरार झाले. या गोळीबारात कारमध्ये असलेले कुमार गंभीर जखमी झाले.

बेशुद्धावस्थेत असलेल्या रुपेश कुमार यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेवरून विरोधकांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी ट्विट करून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बिहारमध्ये दररोज होत असलेल्या खून, चोºया, अपहरण आणि बलात्काराच्या शेकडो घटना भाजपाप्रणित नितीश कुमार सरकारची खास काम आहेत, असा टोला लगावत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी तेजस्वी यादव यांनी केली आहे.

आत्महत्येची चिठ्ठी लिहून शेतकरी बेपत्ता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या