26.1 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeक्राइमपती-पत्नीच्या वादात हस्तक्षेप; मुलाकडून बापाचा खून

पती-पत्नीच्या वादात हस्तक्षेप; मुलाकडून बापाचा खून

एकमत ऑनलाईन

शिरपूर : मुलगा व सुनेतील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वयोवृद्ध बापावर प्राणघातक वार करून मुलाने त्याचा खून केला.

ही घटना गुरुवारी (ता.१६) सायंकाळी साडेसहाला उमर्दा (ता.शिरपूर) गावाजवळ कढईपाणी येथे घडली. पेमा हिरा पावरा (वय ७३) असे मृत पित्याचे नाव असून त्यांचा मोठा मुलगा सुक्राम पेमा पावरा याने त्यांचा खून केल्याचा संशय आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुक्राम पावरा व त्याची पत्नी बायटीबाई यांच्यात नेहमीच भांडणे होत होती. त्यावेळी पेमा पावरा व त्यांची पत्नी सुनेची बाजू घेऊन मुलाला दटावत असत. त्यामुळे त्याचा आई-वडिलांवर राग होता. त्याने यापूर्वी त्यांना घरातून बाहेर काढले होते.

१६ जूनला सायंकाळी सुक्राम पावराने पत्नीसोबत भांडण उकरून काढले. भांडण सोडवण्यासाठी पेमा पावरा गेले. त्यांनी मध्यस्थी करू नये म्हणून सुक्राम त्यांचे दोन्ही हात धरून झोपडीबाहेर घेऊन आला. त्याचा राग आल्याने पेमा पावरा यांनी त्याला शिवीगाळ केली. त्यामुळे संतापून घरातून तीक्ष््ण हत्यार घेऊन आलेल्या सुक्रामने वडिलांच्या पाठीवर सपासप वार केले.

रक्तबंबाळ अवस्थेत ते खाली कोसळले. विक्रम पावरा याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सुक्राम पेमा पावरा यांच्याविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या