17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeक्राइमनागपूरच्या राज पांडेचे अपहरण करून हत्या

नागपूरच्या राज पांडेचे अपहरण करून हत्या

एकमत ऑनलाईन

नागपूर : पूर्ववैमनस्यातून नागपूरमध्ये एका १५ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. राज पांडे असे मृत बालकाचे नाव आहे. राज हा इंदिरानगर परिसरात राहत असून तो गुरुवारी खेळण्यासाठी घराजवळील मैदानात गेला होता. त्यावेळी राजचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येनंतर त्याने गायिलेलं ‘आयेगी मेरी याद’ हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होतंय.

या गाण्याने नागपूरकरांच्या डोळ्यात पाणी आहे. सुरजकुमार साहू याने राजचे अपहरण केले. त्यानंतर राजची आई गीता पांडे यांना फोन केला. त्यावेळी सुरजकुमार साहू याने राजचा काका मनोज पांडे याचं डोकं कापून मला मोबाईलवर फोटो पाठवा, अशी मागणी केली. अन्यथा मी तुमच्या मुलाला ठार मारेन, अशी धमकी सुरजकुमार साहू याने दिली होती.

यानंतर राजच्या आई-वडिलांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने राजचा शोध सुरू केला होता. मात्र, शुक्रवारी सुरजकुमार साहूने राजचा खून केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आता सुरजकुमार साहूला ताब्यात घेतले असून याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

हत्येनंतर राजचे गाणे व्हायरल
१५ वर्षांच्या राज पांडेने गायिलेल्या एका गाण्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ‘आयेगी तुम्हे मेरी याद, वफाये मुझे भूल ना पाओगे करोगे फरियाद रो रो के.. किसी को बता ना पाओगे’ असे बोल असलेलं राजच्या आवाजातील गाणं अनेकांचं हृदय पिळवटून टाकतंय.

सचिन पायलट दिल्लीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या