16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeक्राइमपोलिसांसमोर मजुराची आत्महत्या

पोलिसांसमोर मजुराची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

सोलापूर : तपासासाठी घेऊन गेल्यानंतर एका मजुराने पोलिसांसमोरच खाणीत उडी टाकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ३ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री आठच्या सुमारास घडली याप्रकरणाची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली आहे.

नवनाथ शंकर पवार (वय ३२, रा. गणपती घाट, मंठाळकर वस्ती, तळेहिप्परगा सोलापूर-तुळजापूर रोड, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मयत नवनाथ पवार यांना घेऊन ३ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी २ वाजता संजय प्रभाकर लिंबोळे (रा. न्यू पाच्छा पेठ, अशोक चौक, सोलापूर) हे नातेवाईकांसह सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात घेऊन आले होते. संजय लिंबोळे याने पोलिसांसमोर पोकलेनचे पार्ट नवनाथ याने तळेहिप्परगा येथील दगड खाणीत लपविल्याचे सांगितले. तेथे नेल्यानंतर त्याने खाणीत उडी टाकली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या