25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeक्राइमएकाच कुटुंबातील चौघींवर मांत्रिकाचा बलात्कार

एकाच कुटुंबातील चौघींवर मांत्रिकाचा बलात्कार

एकमत ऑनलाईन

नागपूर: एकाच कुटुंबात राहणा-या चार महिलांवर भोंदू मांत्रिकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भूत बाधा करून आणि त्याचा धाक दाखवत उपचार करण्याच्या नावाखाली भोंदू मांत्रिकाने अल्पवयीन मुलीसह तिची आई, मामी आणि आजी अशा एकाच कुटुंबातील चौघींवर सात महिन्यात कित्येकदा बलात्कार केला. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी वयवर्ष ५० असणा-या धर्मेंद्र विठोबा निनावे उर्फ दुलेवाले बाबा मांत्रिकाला अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, घडलेल्या प्रकरणातील आरोपी हा निवावे पारडीत राहण्यास आहे. याच भागात पीडित महिलेचे कुटुंब राहत असून पीडित मुलीचे वयवर्ष १७ वर्ष असून ती इयत्ता अकरावीत शिकत आहे. २०१८ पासून या मुलीच्या वडिलांची आरोपी निनावे सोबत ओळख होती. यामुळे तो या कुटुंबातील माणसांवर उपचार करण्यासाठी कधी कधी भोंदूगिरीच्या मार्गाने अंगारे, धुपारे करायचा.

बर्ड फ्लूला घाबरु नका; सतर्क रहा!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या