22 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home क्राइम रागाच्या भरात बहिणीचा गळा दाबून केला खून

रागाच्या भरात बहिणीचा गळा दाबून केला खून

एकमत ऑनलाईन

बुलडाणा : नात्याला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना बुलडाणा शहरात घडली आहे. शहरातील विदर्भ हाउसिंग सोसायटीमध्ये सख्या भावाने आपल्या बहिणीला मारहाण करून गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे.

विदर्भ हाउसिंग सोसायटीमध्ये आरोपी सागर शर्मा हा आपली बहिण अंकिता शर्मासोबत राहत होता. आज सकाळी त्याने बहिणीला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर रागाच्या भरात गळा आवळून खून केला. ही घटना आज सकाळी घडली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत अंकिता शर्माचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. खुनाचे नेमके कारण समजू शकले नसले तरी भावानेच बहिणीचा खून केल्याचे उघड झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खून का झाला याचा बुलडाणा शहर पोलीस तपास करीत आहे.आरोपी सागर शर्मा हा सराईत गुन्हेगार आहे. बहिणीचा खून केल्यानंतर त्याने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जावून खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी आरोपी भावाला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Read More  दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,406FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या