हैदराबाद : पोलिसांनी एका ४५ वर्षीय सीरिअल किलरला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे, १८ महिलांच्या हत्येमागे या सीरिअल किलरचा हात असल्याची माहिती हैदराबाद पोलिसांनी दिली आहे. महिलांच्या हत्येशिवाय इतर अनेक गुन्हे त्याने केले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. नुकत्याच हत्या झालेल्या दोन महिलांच्या प्रकरणाचाही यामुळे उलगडा झाला आहे.
आरोपीने गेल्या २४ वर्षात १८ महिलांची हत्या केली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मंगळवारी दोन महिलांच्या हत्येप्रकरणी हैदराबादचे पोलिस आयुक्त अंजनी कुमार यांनी एकाला अटक केली होती. अटकेनंतर आरोपीचा तब्बल २१ गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. संपत्तीशी संबंधित गुन्हे, पोलिस कोठडीतून पळून जाणे यासह हत्येसारख्या गंभीर प्रकरणी आरोपीवर गुन्हे दाखल आहेत.
आरोपीचे वयाच्या २१ व्या वर्षी लग्न झाले होते. पण, लग्नाच्या काही दिवसानंतरच त्याची पत्नी दुस-या व्यक्तीसोबत पळून गेली. या गोष्टीचा त्याच्या मनात प्रचंड राग होता. तेव्हापासून तो महिलांबद्दल द्वेष बाळगत होता. याच रागातून त्याने अनेक महिलांची हत्या केली आहे. आरोपीने वयाच्या २५ व्या वर्षीपासूनच गुन्हे करण्यास सुरुवात केली होती.
उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती