27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeक्राइमअल्पवयीन मुलाकडून आईची हत्या

अल्पवयीन मुलाकडून आईची हत्या

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीमध्ये अल्पवयीन मुलाने जन्मदात्या आईचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाच्या वडिलांनी त्याच्या आईकडे घटस्फोटाची मागणी केली होती. मात्र, आईने घटस्फोट देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याचे मित्र त्याची टर उडवत त्याला टोमणे मारत होते. मित्रांच्या टोमण्याने त्रस्त झालेल्या अल्पवयीन मुलाने जन्मदात्या आईचीच हत्या केली आहे.

पोलिसांनी अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. अल्पवयीन मुलाला अटक करून ज्युवेनाइल न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. मृत महिला मुली आणि मुलासह दिल्लीत राहत होती. सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी ती पतीपासून विभक्त झाली होती. न्यायालयात त्यांच्या घटस्फोटाचा खटला सुरू होता. पती घटस्फोटाची मागणी करत होता. मात्र, तिने घटस्फोट देण्यास नकार दिला होता.

मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या