24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्राइमपोलिस कर्मचा-याचा खून

पोलिस कर्मचा-याचा खून

एकमत ऑनलाईन

यवतमाळ : जुन्या वादातून दोन युवकांनी पोलिस मुख्यालयासमोरच पोलिस कर्मचा-याची हत्या केली आहे. ही घटना बुधवारी रात्री यवतमाळ जिल्ह्यात घडली असून खून प्रकरणाने पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. निशांत खडसे असे मृत पोलिस कर्मचा-याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निशांत खडसे हे पोलिस दलात कार्यरत होते. ते काल बुधवारी रात्री कामानिमित्त पोलिस मुख्यालय येथे गेले होते. तेव्हा दोन तरुणांनी अचानक पोलिस मुख्यालयाच्या गेटजवळ लोखंडी रॉडने हल्ला चढवून निशांत खडसे यांची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. या हत्येप्रकरणी पुढील तपास सुरू असून पोलिस कर्मचा-याचा मुख्यालयाजवळच खून झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या