24.7 C
Latur
Wednesday, January 20, 2021
Home क्राइम अनैतिक संबंधातून तरुणाचा खून

अनैतिक संबंधातून तरुणाचा खून

एकमत ऑनलाईन

पुणे : पुण्यातील नवले ब्रिजजवळ तरुणाचा खून करून हात-पाय बांधून पोत्यातील मृतदेहाचे गूढ उकलण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. खूनप्रकरणी एकाला अटक केली आहे. अनैतिक संबंधातून तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. रोहिदास पाटोळे (वय 45, रा. कात्रज) याला पकडण्यात आले आहे. अमर क्षीरसागर (वय 22, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमर हा महापालिकेत काँट्रॅक्ट बेसवर नोकरी करत होता. त्याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्याच महिलेसोबत रोहिदासचे संबंध होते. त्यातून दोघांचे वाद सुरू होते. या कारणावरून रोहिदासने त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेह पोत्यात घालून फेकून दिले होता. चार दिवसांपूर्वी नवले ब्रिजजवळ पोत्यात हात-पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्ह्यांची उकल केली आहे.

चक्रवाढ व्याज सरकार भरणार?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या