31 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home क्राइम दीड कोटीसाठी दत्तक मुलाची हत्या

दीड कोटीसाठी दत्तक मुलाची हत्या

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये राहणा-या एका जोडप्याने विम्याचे पैसे मिळवण्यासाठी दत्तक घेतलेल्या भारतीय मुलाची हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या जोडप्यांनी सर्वप्रथम भारतातील एका मुलाला दत्तक घेतलं आणि त्याच्या नावावर दीड करोड रुपयांचा विमा काढला. त्यानंतर या विम्याचे पैसे मिळवण्यासाठी या जोडप्यांनी थंड डोक्याने दत्तक मुलाचा काटा काढला आहे. पण या जोडप्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. भारत सरकारने या जोडप्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनकडे मागणी केली होती.

मात्र मानवाधिकाराच्या कायद्यांमुळे त्यांचा प्रत्यार्पण होण्यात अडचणी येत आहेत. ५५ वर्षीय आरती धीर आणि त्यांचा पति ३१ वर्षीय कवल रायजादा हे दोघंही ब्रिटनमधील हीथ्रो विमानतळावरील माजी कर्मचारी आहेत. या जोडप्याने २०१५ साली गुजरातमधील मलिया हटिना या गावातील एका अनाथ मुलाला दत्तक घेतले होते़ या मुलाचे नाव गोपाल सेजानी असे आहे. दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या जोडप्याने या मुलाच्या नावावर वेल्थ बिल्डर विमा पॉलिसी खरेदी केली.

तोडलेले मंदिर पुन्हा बांधणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,414FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या