22.6 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home क्राइम संपत्तीच्या वादात वडिलांची हत्या

संपत्तीच्या वादात वडिलांची हत्या

एकमत ऑनलाईन

बारबंकी : उत्तर प्रदेशच्या बारबंकीमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. संपत्ती नावावर करत नसल्याने मुलानेच जन्मदात्या पित्याची क्रूरपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीला आणि त्याच्या पत्नीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

संपत्तीच्या हव्यासापोटी मुलाने वडिलांची हत्या केल्याच्या घटनेने संताप व्यक्त होत आहे. बाराबंकीतील फतेहपूर गावात श्रीराम गौतम (५५) मुलगा आणि सुनेसह राहतात. त्यांचा मुलगा मनोज संपत्ती आपल्या नावावर करण्यासाठी वडिलांच्या मागे तगादा लावत होता. मात्र, मुलाच्या नावावर संपत्ती करण्यास वडील नकार देत होते. यावरून त्यांच्यात वाद होत होते.

मुलगा आणि वडिलांमध्ये शुक्रवारी पुन्हा एकदा संपत्ती नावावर करण्यावरून वाद सुरू झाला आणि तो विकोपाला गेला. वडिलांनी मुलाच्या नावे संपत्ती करण्यास ठाम विरोध केला. त्याचा राग आल्याने मुलाने वडिलांना खेचत घराबाहेर आणले. घराबाहेर असलेल्या झाडाला त्यांना बांधले आणि पत्नीच्या मदतीने वडिलांचा गळा चिरून त्यांची क्रूरपणे हत्या केली. या घटनेने गाव हादरले आहे. गावकºयांनी मनोजला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावक-यांची नजर चूकवून तो पत्नीसह फरार झाला.

राज्यात ६ हजारांहून अधिक बाधित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या