19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeक्राइमआत्महत्येचा बनाव करत पतीची हत्या

आत्महत्येचा बनाव करत पतीची हत्या

एकमत ऑनलाईन

बीड : दोन दिवसांपूर्वीच बीडच्या गेवराईमध्ये एका नवविवाहित पत्नीने आपल्या पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती आणि त्यानंतर आता परळी तालुक्यातल्या शिरसाळ्यात देखील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिरसाळ्यातला गोवर्धन हिवरा येथे दारू पिऊन आलेल्या पतीसोबत पत्नीचे भांडण झाले आणि याच भांडणातून पत्नीने दोरीने आपल्या पतीचा गळा आवळून खून केला आहे.

हनुमान काकडे असे ३० वर्षीय मयत तरुणाचे नाव असून रात्री हनुमान हा दारू पिऊन घरी आल्यानंतर त्याचे पत्नी वैष्णवीसोबत जोराचे भांडण झाले. याच भांडणाचा राग मनात धरून वैष्णवीने हनुमानचा गळा आवळून त्याची हत्या केली. हनुमानचा मृत्यू झाल्यानंतर वैष्णवीने त्याचा मृतदेह घराच्या छताला लटकवला आणि त्याने आत्महत्या केल्याचा बनाव करत त्याच्या मृत्यूची माहिती स्वत: पोलिसांना दिली..

हनुमान काकडे यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता त्याचा गळा आवळून खून झाल्याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली. या प्रकरणात पोलिसांनी अधिक तपास केला असता हनुमानची पत्नी वैष्णवी हिनेच त्याचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले आणि त्यानंतर पोलिसांनी वैष्णवीला ताब्यात घेतले असून तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या