28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeक्राइमचारित्र्याच्या सशंयावरुन पत्नीचा खून; पतीस जन्मठेप

चारित्र्याच्या सशंयावरुन पत्नीचा खून; पतीस जन्मठेप

एकमत ऑनलाईन

बिलोली: नायगाव तालूक्यातील राहेर येथे पतीने पत्नीच्या चारीर्त्यावर संशय घेवून तिचा गळा आवळून खून केल्याची घटना २०१८ ला घडली होती. अखेर न्यायालयाने या प्रकरणात साक्षी, पुराव्याची पडताळणी करून आरोपी पतीस जन्मठेपेची शिक्षा व पाच हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. असा महत्वपुर्ण निकाल बिलोली सत्र न्यायालयाने दि.३ नोव्हेंबर रोजी दिला.

शंकरगंज धर्माबाद येथील तरुणी सपना गणपत नारवाड हिचा विवाह आरोपी पुंडलिक पिल्लेवाड याच्याशी झाला होता पण लग्ना पासुनच आरोपी पुंडलिक याने पत्नीवर संशय घेता होता हे विचार टोकास जावुन दि. ३ नोव्हे. २०१८ रोजी म्हणजे आज पुर्णपणे चार वर्षा पुर्वी आरोपी पुंडलिक पिल्लेवाड याने मयत पत्नी सपना पुंडलिक पिल्लेवाड हिचा गळा आवळुन खून केला, यावरुन मयताची आई रेखा गणपत नारवाड (वय ४५, रा.शंकरगंज धर्माबाद) यांच्या तक्रारीवरुन कुंटुर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होऊन, दोषारोपपत्र अति.सत्र न्यायालय बिलोली येथे दाखल करण्यात आले.

 

ही केस तब्बल चार वर्ष चालली असुन न्यायालया समोर आलेल्या साक्षी पुराव्याच्या आधारे गुरुवारी दि.३ नोव्हे २०२२ रोजी सत्र न्यायालयाचे न्यायाधिश दिनेश ए.कोठलीकर यांनी आरोपी पुंडलिक यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली व पाच हजार रुपये दंड ही लावला दंड नाही भरल्यास पुन्हा तिन महीण्याची सजा सुनावण्यात आली.

सरकार पक्षा कडुन सरकारी वकील संदिप कुंडलवाडीकर यांनी काम पाहीले होते तर सदर प्रकरणाचा तपास एपीआय शरद एस.मरे यांनी केला. तर पैरवि अधिकारी म्हणून पंडित ईरबा ईजुलकंटे यांनी मदत केली. विशेष म्हणजे घटणा ही ३ नोव्हेंबर ला घडली तर शिक्षा ही३ नोव्हेंबरलालाच सुनावण्यात आली.म्हणजे हा निकाल पुर्णपणे चार वर्षात लागला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या