बुलडाणा : बारावीत इंग्रजी विषयात कमी गुण मिळाल्याने बुलडाण्यात 18 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. बारावीत 80 टक्के मिळूनही इंग्रजीत कमी मार्क मिळाल्याने मानसिक तणावातून या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे
बुलडाणा येथील सहकार विद्या मंदिरात शिकत होता
बुलडाणा जिल्ह्यातील कव्हळा येथील विनायक लांडे या विद्यार्थ्याने 12 वीच्या इंग्रजी विषयात कमी गुण मिळाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. कव्हळा येथील विनायक लांडे हा 18 वर्षीय विद्यार्थी बुलडाणा येथील सहकार विद्या मंदिरात शिकत होता. नुकताच त्याचा 12 वीचा निकाल लागला.
विनायकच्या बहिणीला त्याच्यापेक्षा जास्त मार्क म्हणजे 84 टक्के मिळाले
विनायकला 80 टक्के मार्क्स मिळूनही त्याला इंग्रजी विषयात 56 मार्क्स मिळाले. मात्र, विनायकच्या बहिणीला त्याच्यापेक्षा जास्त मार्क म्हणजे 84 टक्के मिळाले. त्यामुळे विनायक तणावाखाली गेला. विनायक आज सकाळी झोपेतून उठून कोणालाही न सांगता घरुन शेतात गेला. त्याठिकाणी त्याने आंब्याच्या झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Read More रणबीरचा डुप्लीकेट जुनैद शाहचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे मृत्यू